Monday, December 28, 2009

विचार...


तुला प्रेमपत्र लिहतांना साक्षी ठेवलेल्या,

प्रेमदेवतेला विचार...

तु येण्याची वाट पाहत जिच्यावर तासन् तास बसलो,

त्या वाटेला विचार...

दिवसरात्र तुझीच स्वप्ने बघणार्‍या,

माझ्या डोळ्यांना विचार...

चंद्राची व तुझी तुलना करतांना,

तयार झालेल्या कवितांना विचार...

तुझ्या आठवणीत रात्री जागतांना, ज्यांना मला पाहिलं,

त्या चांदण्यांना विचार...

माझं तुझ्यावर किती प्रेम आहे,

हे तेव्हा तुला कळेल...

माझ्या राखेतील अस्थींतुन सुद्धा,

तुला तुझेच नाव ऐकायला मिळेल...

खुबसुरत सी चाहत


बनकर मेरी

खुबसुरत सी चाहत,

बुँद बुँद कोई दिल में उतरी|

बेखबर सा अंजानी राहों पर,

राह में कोई पहलू से गुजरी|

ढलते सुरज की लेकर लालीमा सी,

ऑंखो में प्यारी सी तसबीर उभरी|

होकर ख्यालों सी,

दिल पे बरखा,

छाई बनकर,

कोई बहार की मयुरी|

लगकर एक,

आग सी दिल में,

खुशबु उसकी,

संदल सी बिखरी....|

Sunday, December 13, 2009

असंच काहीतरी

एक डाव माह्या सपनात श्रीदेवी आली.
म्हने काळजी नोको करु तुले भेटनार हाये पैसेवाली.
आंग पाय धुऊन दुसर्‍याच दिवशी मोहीम चालु केली.
पन घराच्या बाहेर निंघाल्या बरोबर, घरचीच मांजर आडवी गेली.

बस स्टँड वर ऊभा होतो तं, आल्या जींसवाल्या.
म्या केसातुन हात फीरवला तं फिदीफिदी हासुन गेल्या.
मनात म्हनलं आपन साली कारवालीच पाहाव.
लगन करुन तिच्यासंग मंग भल्ली ऐश कराव.

कार थांबवाले एकीची, हात पुढं केला.
तं समोरुन येनार्‍या मानसानं, हातात रुपया टाकला.
म्हने धडधाकट असुन भीक मांगाची लाज नाही वाटत काय तुले?
म्हटलं, तु काय भिकारी समजला काय बे मले?

मांगं पलटुन पाह्यलं तं एक कार येऊन थांबली.
अनं तिच्यातली पोरगी मलेच बोलाऊन राह्यली.
मनात म्हनलं हे काहुन बोलावते आपल्याले?
आपल्यासाठी श्रीदेवीनंच तं पाठंवलं नसंन हिले?

जवळ गेलो तं थे म्हने, इंजीनीरींग कालेज कुठं हाये?
म्या बी थाप ठोकली, मले बी तं तिथंच जायंचं हाये.
दरवाजा उघडुन थे म्हने, मंग माह्यासंग चाला.
मनात म्हनलं साला भल्ला चान्सं आला.

गाडीत बसल्याबरोबर तिनं गानं चालु केलं.
पन इंग्रजी होतं म्हनुन मले थोडंसकबी नाय समजलं.
म्या इच्यारलं तुमचं लगंन झालं का नायी?
थे म्हने तुमच्यासारखा कोनी हॅन्ड्समच भेटला नायी.

नाव इच्यारलं तं थे म्हने, माय नेम इज शालु.
मनात म्हनलं च्या बहीन, दिसते बी भल्ली चालु.
म्हने मायं तुमच्यावर पहील्या नजरेतंच प्रेम बसलं.
मनात म्हनलं, हे तं सालं, भल्लं मस्तं जमलं.

जवळ ओढुन म्या तिच्या ओठात ओठ घातले.
तेवढ्यात माह्या मायचा आवाज ऐकु आला मले.
माय म्हने अमल्या उठतं का नायी? अरे सुर्य वरतं आला,
अन् मंघान् पासुन पाहुन राह्यली , थ्या मांजरीलेच पिचकुन राह्यला....