Thursday, July 29, 2010

आव्हानांवर मात करा

डिसक्लेमर : हे लिखाण माझे स्वतःचे नाही. जेव्हा मी काही वैयक्तिक कारणांमुळे नैराश्येच्या गर्तेत बुडालो होतो. तेव्हा माझ्या एका खास मित्राने मला एक मोटिवेशनल पुस्तक वाचायला दिले होते. ज्या लेखाने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला तो हा लेख आपल्याशी शेअर करीत आहो.


जापान्यांना ताजे मासे खुप आवडतात. पण दशकांपासुन जापानच्या किनारपट्टी जवळील पाण्यात खुप कमी मासे आहेत. म्हणुनच जापानी लोकांच्या उदरभरणासाठी मासेमारी करणार्‍या बोटी मोठ्या झाल्यात, मासेमारी करण्यासाठी कधी नव्हे त्या इतक्या दुरवर जाऊ लागल्यात. मासेमार जेवढा दुर जाऊ लागला तेवढा वेळ त्याला मासे घेऊन परतायला लागायला लागला आणि तेवढ्या प्रमाणात मासे शिळे व्हायला लागलेत. जापान्यांना शिळ्या माशांची चव आवडली नाही.आणि म्हणुनच ही समस्या दुर करण्यासाठी मासेमारी करणार्‍या कंपन्यांनी आपल्या बोटींवर मोठाले freezers लावले. ते मासे पकडायचे आणि त्यांना गोठवुन ठेवायचे.
freezers मुळे बोटी आणखी दुरवर जायला लागल्यात, जास्त काळ समुद्रावर राहायला लागल्यात. पण जापान्यांना ताजे मासे आणि गोठवलेले मासे यांच्या चवीतला फरक जाणवला आणि गोठवलेल्या माशांच्या किंमती धाडकन कोसळल्या. म्हणुन मासेमारी करणार्‍या कंपन्यांनी आपल्या बोटींवर fish tanks लावले. ते मासे पकडायचे आणि त्यांना fish tanks मध्ये सोडुन द्यायचे. अगदी दाटीवाटीने. आपसातल्या थोड्याश्या कुरबुरी नंतर किंवा भांडणानंतर म्हणा हवं तर, माशांची हालचाल पुर्णपणे थंडावली. जीवंत पण अतिशय गलितगात्र मासे, पण बरेच दिवस हालचाल न केल्यामुळे मृतवत होऊन आपली चव हरवुन बसले.
आता मासेमारी कंपन्यांसमोर एक नविनच समस्या उभी राहली होती. पण आज त्या समस्येवर मात करुन मासेमारी हा जपान मधील अतिशय मोठ्या आणि महत्वाच्या उद्योगांपैकी एक आहे. माशांची चव ताजी ठेवण्यासाठी आजही जपानी मासेमारी कंपन्या त्या माशांना fish tanks मध्ये ठेवतात. मग.......काय उपाय केला असेल बरं त्यां कंपन्यांनी ?

ते आता प्रत्येक fish tank मध्ये एक छोटासा शार्क मासा सोडतात. तो त्यातल्या काही माशांना खातो खरा पण ईतर मासे मात्र जगण्यासाठी आव्हान मिळाल्यामुळे आणि ते स्विकारल्यामुळे नुसते जीवंतच नाही तर तंदुरुस्त सुद्धा राहतात. सहाजिकच अशा माशांना चांगली मागणी आणि किंमत मिळते.



माणसं सुद्धा काही वेगळी नाहीत. १९५० च्या सुरुवातीला L. Ron Hubbard यांनी केलेल्या संशोधनानुसार "आव्हानात्मक वातावरणातच माणुस प्रगती करु शकतो."

तुम्हाला सळसळतं आणि दमदार आयुष्य जगायचं असेल तर आयुष्यात येणार्‍या प्रत्येक आव्हानाला, संकटाला,समस्येला समोर गेलं पाहीजे. तेव्हाच जगण्याचे नवनविन मार्ग शोधता येतात. आव्हानांना, समस्यांना वळसा घालुन गेल्यापेक्षा त्यांना स्वीकारा, त्यांच्या मुळापर्यंत पोहचा. त्याबद्दल अधिक ज्ञान मिळवा, अधिक चिकाटीने काम करा. पुढील मदत आपोआप मिळत जाईल.
म्हणुनंच रामदास स्वामींचा एक श्लोक मला इथे नमुद करावासा वाटतो.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहीजे |

No comments:

Post a Comment