Friday, October 2, 2009

कस॑ सा॑गू मी तुला




कसं सांगू मी तुला,
माझ्या प्रितीच्या फुला,
तुझ्या वाचुनी मला,
आता करमत नाही......

मी झालो वेडा-पिसा,
हा रोग असा कसा,
चारचौघांमधे मी,
आता मिरवत नाही......

एकांतात बसुनी,
तुझे चिंतन मनी,
आठवण दुसरी,
आता करवत नाही......

स्वप्नी छळते फार,
खरं कधी येणार,
मिठीत येना धीर,
आता धरवत नाही.....
मिठीत येना धीर आता धरवत नाही.....

No comments:

Post a Comment